संपत्तीच्या वादातून दाेन गटात हाणामारी; चाकू हल्ल्यात दाेन जखमी; मेहकरातील घटना, तिघांना पाेलिसांनी केली अटक..!

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संपत्तीच्या जुन्या वादातून मेहकर शहरातील दाेन गटात मंगळवारी रात्री हाणामारी झाली. यावेळी चाकुहल्लाही करण्यात आला. यामध्ये दाेन जण जखमी झाले. या प्रकरणी परस्परविराेधी तक्रारीवरून मेहकर पाेलिसांनी दाेन्ही गटाच्या लाेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यातील तीन आराेपींना मेहकर पाेलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयासमाेर हजर केले. न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलीस काेठडली सुनावली. 
मेहकर शहरातील एका धार्मिकस्थळाजवळील व्हरायटी बूट हाउस बंद करून छट्टू इत्तू गवळी हे घरी जात असताना, जुन्या तहसील चौकातील दुकानासमोर उभे असलेल्या असलम रहेमान गवळी, जावेद रहेमान गवळी आणि फिरोज रहेमान गवळी यांनी त्यांच्यावर हल्ला केला. छट्टू गवळी यांच्या चेहऱ्यावर आणि पोटात वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. या झटापटीत असलम गवळीही जखमी झाला.
जखमी छट्टू गवळी यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तर असलम गवळी यांना वाशिम येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी चंदू गवळी, जावेद गवळी आणि फिरोज गवळी यांना अटक केली असून, बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर पोलिसांकडे परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या. चंदू हत्तू गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून असलम, जावेद आणि फिरोज गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे, फिरोज गवळी यांच्या तक्रारीवरून छट्टू हत्तू गवळी, मोहम्मद हत्तू गवळी व चंदू गवळी यांच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.