

BIG BREAKING चिखली तालुका क्रीडा संकुलाच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून दोघांचा मृत्यू!
Apr 10, 2025, 19:15 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीतील तालुका क्रीडा संकुलाच्या स्विमिंग पूल मध्ये दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज,१० एप्रिलच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात एका बाजूला स्विमिंग टॅंक आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या स्विमिंग टॅंक वर पोहणाऱ्यांची गर्दी असते. आज, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन विद्यार्थी या टॅंक मध्ये बुडून मरण पावले. दोघेही बीएमएस कॉलेजला वैद्यकीय शिक्षण घेत होते अशी माहिती प्राप्त झाली आहे. मृतकांपैकी एक बीड जिल्ह्यातील तर दुसरा अकोला जिल्ह्यातील अकोटचा असल्याचे समजते. एकाचे नाव विवेक वायडे तर दुसऱ्याचे नाव सुरेश वानखेडे असे आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा संकुल नजीकच्या भराड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.