पेनटाकळी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये बुडून दोघींचा मृत्यू! चिखली तालुक्यातील नायगाव हादरले...! एक मामाच्या घरी आली होती लग्नाला...
Jun 18, 2025, 18:53 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील नायगाव आज दुपारी हादरले.. दोन मुलींचा पेनटाकळी धरणातील बॅक वॉटर मध्ये बुडून मृत्यू झाला.. एकीचे वय १७ तर दुसरीचे वय १० वर्षे आहे.
प्राप्त माहितीनुसार नायगाव मध्ये नाटेकर कुटुंबीयांच्या घरी १६ जूनला लग्न होते. त्यासाठी कव्हळा येथील खंडारे कुटुंबीय नायगाव खु येथे आले होते. लगीन घरच्या काही मुली आज कपडे धुण्यासाठी धरणावर गेल्या होत्या. त्यावेळी काही अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने कव्हळा येथील वैष्णवी महादेव खंडारे ही १७ वर्षीय मुलगी व नायगाव येथील राजनंदिनी निंबाजी नाटेकर(१०) अशा दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघींचे मृतदेह उत्तर ये तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.