

बुलडाण्यात दोन ऑटो चालकांचे कांड? कारंजा चौकात मोबाईल कव्हर विकणाऱ्या तरुणासोबत रात्री....
Mar 11, 2025, 08:54 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यात हल्ली गुन्हेगारांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छोट्या-मोठ्या चोऱ्या, लुटमार नित्याची झालीं आहे.. सहज उपलब्ध होणारे नशिले पदार्थ वाढत्या गुन्हेगारीसाठी कारणीभूत आहेत.. अमली पदार्थांच्या आहारी गेलेली तरुणाई त्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे.. बुलढाण्याच्या कारंजा चौकात मोबाईलचे कव्हर विकणाऱ्या तरुणांसोबत विकी आणि राजा नामक तरुणांनी चुकीचे काम केले.. दोघेही बुलढाण्यात ऑटो चालक आहेत..
जोहर नगरातील सय्यद साकिब सय्यद अलीम (२७) हा तरुण कारंजा चौकात मोबाईल कव्हर विकण्याचे काम करतो. रात्रीच्या वेळेला तो देऊळघाटवरून नातेवाईकांकडून बुलढाण्याकडे येत होता. त्यावेळी धाड नाक्यावरील अपंग निवासी विद्यालयाच्या समोरील टर्निंग जवळ त्याच्या ओळखीच्या विकी आणि राजा नामक तरुणांनी त्याची मोटरसायकल अडवली. आम्हाला पैसे दे असे म्हणत त्या दोघांनी साकीबला फायटरने मारहाण केली. खिशातील १८०० रुपये आणि हातातील ८ हजारांची चांदीची चैन घेऊन दोघेही पसार झाले. विकी आणि राजा बुलढाणा शहरात ऑटो चालवतात, दोघांनाही साकिब ओळखतो.मारहाण करणाऱ्या दोघांवर कारवाई व्हावी अशी मागणी साकीब ने तक्रारीत केली आहे...