जबरी चोरीतील दोन आरोपी वरणगावातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कामगिरी; मलकापूर शहर व नांदगाव (नाशिक) येथील गुन्ह्यांची उकल; एक लाखांचा मुद्देमाल जप्त..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील जबरी चाेरी प्रकरणात स्थानिक  गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई कारवाई  करीत जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील दाेघांना जेरबंद केले. या कारवाईमुळे मलकापूर शहर व नांदगाव (जि. नाशिक) पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली असून, तब्बल एक लाख रुपये किंमतीची पल्सर मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.अब्बास इबादात शेख (अली) ईराणी, वय २३, रा. भुसावळ, ह.मु. वरणगाव (जि. जळगाव) व साहिल हुसैन मोहम्मद इज्जत अली जाफरी, वय २१, रा. बिदर (कर्नाटक) असे अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. 

३१ ऑगस्ट रोजी रात्री मलकापूर येथे फिर्यादी निकीता कार्तिक गोरे (वय २१) यांच्याकडील १८ ग्रॅम सोन्याची पोत (किंमत १,२६,००० रु.) दोन इसमांनी मोटरसायकलवर येऊन जबरी हिसकावून नेली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वरणगाव येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींनी मलकापूर शहरासह नांदगाव (जि. नाशिक) येथेही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.  अब्बास इबादात शेख (अली) ईराणी, वय २३, रा. भुसावळ, ह.मु. वरणगाव (जि. जळगाव) व साहिल हुसैन मोहम्मद इज्जत अली जाफरी, वय २१, रा. बिदर (कर्नाटक) यांना अटक केली. त्यांच्याकडून पथकाने बजाज पल्सर मोटरसायकल किंमत एक लाख रुपये जप्त केली. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चांद,  गणेश पुरुषोत्तम पाटील, पो्का. गजानन गोरले, मपोका. आशा मोरे, चापोकां. निवृत्ती पुंड, शिवानंद हेलगे , पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. कैलास ठोंबरे  बुलढाणा यांनी केली.सध्या आरोपींना मलकापूर शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.