पंचवीस वर्षीय स्वप्नील घरातून दुचाकी घेवून निघून गेला!घरच्यांनी शोध घेतला धक्कादायक माहिती आली समोर...खामगाव शहरातील घटना...

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंचवीस ववर्षीय तरुणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरानजीक जनुना शिवारात उघडकीस आली आहे. स्वप्नील विजय गायकवाड (२५) रा.सतीफैल (खामगाव) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
स्वप्नील हा २१ ऑगस्ट च्या रात्री आपली दुचाकी घेवून घराबाहेर निघून गेला.बराच वेळ झाला मात्र स्वप्नील घरी परतला नाही.घरच्यांनी, स्वप्नीलच्या मित्रांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र  तो सापडला नाही.अखेर स्वप्नीलची दुचाकी जनुना तलावाच्या जवळ आढळून आली. त्यानंतर तलावात शोध घेतल्यानंतर स्वप्नीलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने स्वप्नीलचा मृतदेह बाहेर काढला आहे.तसेच पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. स्वप्निल गायकवाड याने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप नेमके कारण समजू शकले नाही.