घटस्फोटीत महिलेच्या असाह्यतेचा घेतला फायदा; प्रेमाच नाटकं करून नको ते केलं; शेवटी जे घडलं ते धक्कादायक! बुलढाणा शहरातील घटना....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरात नात्याला काळिमा फासणारी आणि विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २३ वर्षीय विवाहितेसोबत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या एका नराधमाने, तिला भररस्त्यात सोडून तिची दुचाकी आणि मोबाईल घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत आरोपी अनिल पांडुरंग सनांसे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुलढाणा शहरातील जगदंबा नगरमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेचे पतीसोबत फारकत झालेली असून तिला एक लहान मुलगा आहे. आरोपी अनिल पांडुरंग सनासे (वय ३० वर्षे) रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर याने महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवले. 'तुझी फारकत झाली असली तरी मी तुझ्याशी लग्न करून तुला सुखात ठेवेन,' असे खोटे आश्वासन देऊन त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२३ पासून आरोपीने तिला जाळ्यात ओढले होते. शेगाव येथील एका हॉटेलमध्ये नेऊन
त्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिच्या असहायतेचा फायदा घेतला. इतकेच नव्हे तर, १ जानेवारी २०२६ रोजी त्याने आपल्या मित्राच्या (किशोर राऊत, रा. मादणी) घरी नेऊन तिच्यावर बळजबरी केली. वासनेची भूक न शमलेल्या या नराधमाने १६ आणि १७एप्रिल २०२६ रोजी बुलढाण्यातील रामनगर भागात आपल्या बहिणीच्या घरी देखील फिर्यादीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने तातडीने बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिल सनासे विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.