आजाराला कंटाळून वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी घेतला टोकाचा निर्णय! खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख गावात हळहळ...
Jun 12, 2026, 08:36 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख गावात घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ज्या वयात भविष्याची स्वप्ने रंगवायची असतात, ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची असते त्याच वयात एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतला. मिरचीच्या आजाराला कंटाळून तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक उर्फ यश सुरेश कराळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांत झालेल्या नोंदीनुसार प्रतिकला २०१४ पासून मिरगीच्या आजाराचा त्रास होता. त्याच्यावर अकोला येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू होते.
दरम्यान दीर्घकाळ सुरू असलेल्या उपचार आणि आजारामुळे तो त्रस्त होता.९ जूनला सकाळी ११ पासून तो गायब होता. रात्री तो घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू होता.दरम्यान पिंप्री देशमुख येथील पवन गरड यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन मयूर ने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याला बाहेर काढून खामगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.