सासरच्या त्रासाला कंटाळली! भावाला फोन केला अन् विवाहितेने टोकाचा निर्णय घेतला; संग्रामपूर तालुक्यातील घटना

 
 संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सासू आणि पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. संग्रामपूर तालुक्यातील रुधाणा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी मृतक विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सासू व पती विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.

 चंद्रकला श्रीकृष्ण सावतकर (४०, रा. रुधाणा) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी विवाहितेने भावाला फोन केला. " दादा मला मारहाण केल्या जात आहे,तुम्ही लवकर निघून या.." असे तिने भावाला सांगितले. भावाने तातडीने रुधाणा गाठले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेला होता. चंद्रकला मृत अवस्थेत घरात पडलेली होती..पती व सासू घरात नव्हते. पती व सासू सातत्याने माहेरवरून पैसे आणण्यासाठी चंद्रकलाचा छळ करायचे, तिला मारहाण करायचे..त्यामुळे तिच्या मृत्यूला पती आणि सासू जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.