रेतीची अवैध वाहतूक करणारे टिप्पर केले जप्त,४ ब्रास रेतीसह ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई...
अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, खबऱ्यांच्या माहितीवरून नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी दिग्रस शिवारात पांढऱ्या रंगाचा टिप्पर येताना दिसला. त्याची पंचासमक्ष तपासणी केली असता, सदर वाहनात सुमारे ४ ब्रास अवैध रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने टिप्पर (किंमत ₹३५ लाख) आणि रेती (किंमत ₹४० हजार) असा एकूण ₹३५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी टिप्पर चालकावर कलम ३०३(२) बीएनएस सह कलम २१(१), २१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच आरोपी चालकास अटक करण्यात आली. फिर्यादी म्हणून हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांनी तक्रार दाखल केली.
कारवाईत पीएसआय अविनाश जायभाये, हे.कॉ. जगदेव टेकाळे, हे.कॉ. दिगंबर कपाटे, पो.ना. अनंता फरतळे, आणि पो.कॉ. दीपक वायाळ यांनी सहभाग घेतला.
