रेतीची वाहतूक करणारा टिप्पर केला जप्त; देऊळगाव राजा पोलिसांची कारवाई !

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रेतीची अवैध वाहतूक करणारे टिप्पर देऊळगाव राजा पोलिसांनी जप्त केले.याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून होणाऱ्या अवैध रेती उत्खनन विरुद्ध जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी संयुक्तपणे विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत.तरीही उत्खनन सुरूच आहे.   

उपनिरीक्षक दत्ता नरवाडे आणि त्यांचे पथक दिनांक ३१ ऑगस्ट च्या मध्यरात्री पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त घालत असताना शहरा बाहेरील वळण रस्त्यावरून अवैधपणे रेती तस्कर वाहतूक करणार असल्याचे गोपनीय माहिती मिळाली यानुसार त्यांनी आणि त्यांच्या पथकाने ट्रॅप लावला असता टिप्पर क्रमांक एम एस 14 एलबी 14 16 रेती वाहतूक करताना पकडले त्यामध्ये चार ब्रास रेती किंमत 16 हजार रुपये आणि टिप्पर किंमत एकूण बारा लाख रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त करून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला लावण्यात आलेला आहे पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिप्पर चा चालक आरोपी दत्ताराम मुरली धारे राहणार निमगाव गुरु याच्याविरुद्ध गौण खनिज कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गीते करीत आहे.