कडेकोट सुरक्षा! देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणुकीपूर्वी पोलीस अधीक्षकांची स्ट्रॉंग रूमची पाहणी...
Nov 20, 2025, 14:18 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नगरपरिषद निवडणुकांच्या पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी देऊळगाव राजा येथे स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेतला.
त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची सखोल तपासणी
पाहणीवेळी स्ट्रॉंग रूम परिसरातील खालील बाबींची काटेकोर तपासणी करण्यात आली.
त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था,
तैनात पोलीस बंदोबस्त,
प्रवेश नियंत्रण नोंदवही,
24x7 CCTV निरीक्षण प्रणाली,
सतत दक्ष असणारे सुरक्षा पथक
तसेच परिसरातील फायर सेफ्टी, बॅरिकेटिंग, प्रकाशव्यवस्था, आणि निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या संवेदनशील साहित्याच्या सुरक्षेचीही पाहणी करण्यात आली.
“सुरक्षा शिस्त काटेकोर पाळा” – पोलीस अधीक्षकांचा निर्देश
पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा आणि शिस्तीचे पालन करण्याचे निर्देश दिले.
तसेच, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले.
सुरक्षा व्यवस्था समाधानकारक
पाहणीनंतर सुरक्षा व्यवस्था समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले.
आगामी निवडणुकांदरम्यान कुठलीही सुरक्षाविषयक तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासनही पोलीस विभागाने दिले.
या पाहणीदरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, ब्रह्मगिरी पोलीस निरीक्षक देऊळगाव राजा, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तसेच नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
