३ बोकड ,दोन शेळ्या अन् एक पिल्लू ! लोणारात कायं घडलं?

 
 लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणारच्या उंबर झिरा शिवारात चोरीची घटना समोर आली आहे. बकऱ्यांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या गोठ्यातून बकऱ्या, बोकडे लंपास करण्यात आले. तशी तक्रार लोणार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे..

लोणार येथील शेख सादिक शेख गफूर बकऱ्यांचा व्यापार करतात. उंबरजिरा शेत शिवारात त्यांनी त्यांच्या शेतात तीन शेड चा गोठा तयार केलेला आहे. त्यात ते बकऱ्या ठेवतात्यात..दरम्यान काल,सकाळी ते शेतात गेले असता ३ बोकड,२ शेळ्या , एक पिल्लू गायब दिसले. गोठ्याच्या दरवाज्याला चिर पडलेली दिसली. एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे...