विवाहितेवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी; युवकाविरुद्ध गुन्हा; माेताळा तालुक्यातील खरबडी येथील घटना...!

 
 माेताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील खरबडी येथील एका विवाहितेवर अत्याचार करून तिच्या कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गावातीलच युवकाविरुद्ध बाेराखेडी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक नरेंद्र किनगे (वय 26, रा. खरबडी) असे आराेपीचे नाव आहे. 
या प्रकरणी पिडीत विवाहितीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी प्रतिक किनगे याने जबरदस्तीने आपल्याबराेबर सेल्फी काढून तो गावात व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पती, मुलगा आणि सासू-सासऱ्यांना मारून टाकण्याचीही धमकी देत दि. १२ जून २०२३ ते ५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत वारंवार तिच्या राहत्या घरी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच दि.१४ डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी यांनी संबंध ठेवण्यास विरोध केल्याने आरोपीने त्यांना मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी आराेपी प्रतिक किनगे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले करीत आहेत.