खामगाव तालुक्यात एकाच रात्री चोरट्यांचा धुमाकूळ!बुलढाणा अर्बनच्या अटाळी शाखेवर चोरट्यांचा हातोडा! आंबेटाकळीतही कापड दुकानावर केला हात साप...

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा अर्बनच्या अटाळी शाखेवर चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे.
खामगाव तालुक्यातील अटाळी येथे बुलढाणा अर्बनची शाखा आहे. या शाखेमध्ये २२ सप्टेंबर च्या मध्यरात्री चोरट्यांनी बँकेचे शटर तोडून सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, बँकेमधील लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.आज २३ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. बातमी लिहीपर्यंत पोलीस पोलीस पंचनामा चालू होता.

यासह आंबेटाकळीत एका कापड दुकानावर चोरट्यांनी हात साफ करून कापड दुकानांमधील सीसीटीव्ही फोडून एलईडी स्क्रीनसह कापड दुकान रिकामे केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.