चोरट्यांनो देवाला तरी घाबरा! वारी हनुमान मंदिरात दरोडा;पुजाऱ्याला बांधून हनुमानजीं'च्या अंगावरील आभूषणे लंपास..!

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):चोरट्यांनी आता हद्दच केली चक्क हनुमानजीं'च्या अंगावरील आभूषणे चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
बुलढाणा अकोला जिल्ह्याच्या मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या सुप्रसिद्ध वारी हनुमान समंदिरात आज १५ जानेवारी रोजी धाडसी दरोडा पडला आहे. यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी मंदिराच्या पुजाराला बांधून ठेवत मंदिरातील दागिन्यासह दानपेटीतील रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.यामुळे राज्यभरातील लाखो भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथक, हस्त मुद्रातज्ञ दाखल झाले आहे. ठीक - ठिकाणी नाकाबंदी करून दरोडेखोरांचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात येत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेले वारी हनुमान हे मंदिर समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केल्याचे म्हटले जाते. तेथील निसर्गरम्य परिसरात हे पुरातन जागृत असे हनुमानजीचे मंदिर आहे.मात्र या चोरी मुळे भाकिकांना धक्का बसला आहे.