घरफोडी प्रकरणातील चोरट्यास चिखली पोलिसांनी केले जेरबंद; डीबी पथकाची कारवाई !
Nov 29, 2025, 10:33 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने घरफोडी प्रकरणातील चोरट्याला अवघ्या काही तासांत अटक करत मोठे यश मिळविले आहे.
२७ नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की, त्यांची मोटारसायकल (क्र. एमएच-२८-यू-४६७८) दिनांक २५ नोव्हेंबर रोजी घरासमोर उभी करून लॉक करून ठेवली होती. मात्र २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता बाहेर येताच मोटारसायकल जागेवरून गायब असल्याचे त्यांनी पाहिले. परिसरात शोध घेतला असता मोटारसायकल आढळून आली नाही. त्यावरून पोलिसांनी भा.दं.सं. कलम ३०३(२) नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास डीबी पथकाकडे सोपविला.

ठाणेदार भूषण गावंडे यांनी डीबी पथकाला गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की चिखली शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात एक संशयित इसम पावतीविना टॅब विक्रीसाठी घेऊन फिरत आहे. पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, संशयित इसमाचा पूर्वेतिहास चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे आढळले. टॅबबाबत विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.
तत्पूर्वी २७ नोव्हेंबर रोजी डॉ. प्रशांत चिंचोले यांच्या हॉस्पिटलमधून त्यांचा टॅब चोरीस गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तपासात आरोपीकडील टॅब हा डॉ. चिंचोले यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपीकडे आढळून आलेल्या विनानंबर मोटारसायकलीची पडताळणी केली असता तीही फिर्यादींची चोरीस गेलेली मोटारसायकल असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे पथकाने स्वप्नील तुकाराम बुरकुल (२१), रा. भरोसा, ता. चिखली याला अटक करून त्याच्या ताब्यातून
टॅब – किंमत अंदाजे ₹७,०००
मोटारसायकल – किंमत अंदाजे ₹२५,००० असा एकूण ₹३२,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.