'देवाचाही' नाही राहिला धाक! खामगाव - बुलडाणा रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिरात केले पाप!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सध्या जिल्ह्यात पोलीस दादाचा सोडा देवाचाही धाक चोरट्यांना राहिला की नाही? असा सवाल उपस्थित होतोय. कारण खामगावातील खामगाव - बुलडाणा रोडवरील श्री गजानन महाराज मंदिराची दानपेटी चोरून त्यातील पैशावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
खामगाव बुलढाणा रोडवर रोहणा , वर्णा फाट्यावर श्री संत गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. पंचक्रोषित प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरातील दानपेटी बाजूच्या शेतामध्ये १२ सप्टेंबर रोजी सकाळी दिसून आली त्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये होते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेऊन बाजूला असलेल्या शेतात नेवून फोडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.