तरुणाचा टोकाचा निर्णय! जीवन संपवले; चिखलीच्या संभाजीनगरातील घटना...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखली शहरातील संभाजी नगरात आज,१० मार्चच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडली. भूषण पाराशर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे..

 भूषण ने राहत्या घरी स्वयंपाक घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. भूषण ने आत्महत्या का केली? याचे कारण समोर आलेले नाही. चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत...