ओलांडेश्वर संस्थान दुधा येथे तरुण पैनगंगेत वाहून गेला! शोध सुरू...

 
दुधा
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील ओलांडेश्वर येथे दर्शनासाठी आलेला तरुण पैनगंगेत वाहून गेला आहे. आज,१३ सप्टेंबरच्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सध्या तरुणाचा शोध घेणे सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार साखरखेर्डा येथील रहिवाशी असलेला  रवी नन्हई हा तरुण दर्शनासाठी कुटुंबासह ओलांडेश्वर संस्थान येथे आला होता. अंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात वाहून गेला. तलाठी राहुल मोहिते यांच्यासह महसूल चे पथक घटनास्थळी पोहचले असून स्थानिकांच्या मदतीने तरुणाचा शोध सुरू आहे.