तरुणाला गोडावून वर बोलावले; खुर्चीला बांधून मारले; व्हिडिओही काढला... मलकापुरात खळबळ...
May 19, 2025, 12:24 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून 35 वर्षे तरुणाला मारहाण केल्याची घटना मलकापूर मध्ये घडली आहे. तरुणाला खुर्चीला बांधून मारहाण करण्यात आली. तसेच व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. याप्रकरणी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शे.जाकीर शे.जाबीर या तरुणाला हामशी नगर मधील भंगाराच्या गोदामात बोलून सै. अफरोज सै. हसन कुरेशी, जावेद शहा शफि शहा या दोघांनी शे.जाकीर शे.जाबीर याला खुर्चीला बांधले तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले त्यानंतर खुर्चीसह खाली पाडून शिवीगाळ करत मारहाण केली.
यावेळी सोडून देण्याची विनंती तरुणांकडून करण्यात आली. पंधरा दिवसाची मुदत देतो जर पैसे न दिल्यास ठार मारू अशी धमकी तरुणाला देण्यात आली. अशा फिर्यादीवरून मलकापूर पोलिसात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे हे करीत आहेत.