पत्नी झोपेतून उठली अन् समोरचं दृश्य पाहून हंबरडा फोडला! कर्जबाजारीपणाला वैतागून तरुण शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला! पळसखेड नाईक येथील घटना...

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला..राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज,१७ ऑक्टोबरला सकाळी साडेचारच्या सुमारास पळसखेड नाईक ता.बुलडाणा येथे ही घटना उघडकीस आली. गोपाल आलाराम पवार(३०) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
   सततची नापीकी आणि कर्जपाजारीपणामुळे गोपाल चिंतेत होता. यंदा बऱ्यापैकी उत्पन्नाची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. शेतमालाला भाव नसल्याने तो चिंता व्यक्त करत होता, कर्ज कसे फेडायचे या यु वंचित तो नेहमी रहायचा. 
गोपालने राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. साडेचारला पत्नीला जाग आली तेव्हा तिने एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. गोपालच्या पश्चात पत्नी, २ चिमुकली मुले, आई - वडील असा परिवार आहे..