बायकोने नवऱ्याला पेट्रोल टाकून पेटवले! बुलडाण्यात थरार....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बायकोने नवऱ्याच्या अंगारावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात समोर आला आहे. १३ जानेवारीच्या दुपारी सुंदरखेड परिसरात हा थरार घडला..
प्राप्त माहितीनुसार सुंदरखेड येथील तार कॉलनीत ही घटना घडली. रणधीर हिम्मत गवई असे जळालेल्या पतीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रणधीर गवई यांच्या पत्नी लता रणधीर गवई हिने पती रणधीर गवई यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.. शेजाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळून रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी रणधीर गवई यांच्या जबाबावरून लता गवई विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...