सततच्या पावसाने मध्यरात्री शेतकऱ्याच्या घराची भिंत कोसळली; खामगाव'च्या बोरी-अडगाव'ची घटना....

 
Shetkari
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सतत सुरू असलेल्या पावसाने जिल्हाभर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. यातच खामगावच्या बोरी - अडगाव येथील शेतकऱ्याच्या घराची भिंत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे.
संतोष रामभाऊ ठाकरे (रा.बोरी - अडगाव) हे आपल्या कुटुंबासोबत ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री गाढ झोपेत असताना सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत अचानक कोसळून आवाज झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.घराची भिंत कोसळल्याने ठाकरे यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे यांच्या घरातील सामानाची, घरात असलेल्या अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठाकरे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून त्यांना तात्काळ शासकीय मदत करावी अशी मागणी ठाकरे यांच्या कडून होत आहे.