दाेन राज्यांना हवा असलेला अट्टल दराेडेखाेरास केले जेरबंद; साखरखेर्डा पोलिसांची धडक कारवाई; लाेणी येथील आराेपी..!
Aug 28, 2025, 17:36 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :महाराष्ट्रासह गुजरात राज्यात पाेलिसांना हवा असलेल्या अट्टल दराेडेखाेरास साखरखेर्डा पाेलिसांनी जीवाची पर्वा न करता धारदार शस्त्रासह अटक केली. जखमेश्वर शेनफड़ वय ३० असे दराेडेखाेराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पाेलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.
लोणी येथील अट्टल दरोडेखोर जखमेश्वर शेनफड़ शिंदे हा अट्टल दरोडेखोर पेनसांवगी ते लोणी रस्त्यावर जात असल्याची माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली.त्यांनी विलंब न करता आपले कर्मचारी गजानन वाघ, कडुबा डोईफोड़े, लक्ष्मण इनामे, व अमडापूरचे ठाणेदार निखिल निर्मळ यांनी पाठलाग करून आरोपी जखमेश्वर शिंदे यास एक मोठा चाकू, तलवारीसह मोठ्या शिताफिने अटक केली, आरोपी जखमेश्वर शिंदे यांच्यावर अमडापूर किंगावराजा, साखरखेर्डा, वड़ोदरा गुजरात येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच तो वडोदरा गुजरात येथून पोलिसांच्या ताब्यातून पळून आल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. पुढील तपास पोहेकॉ. कडुबा डोईफोडे करीत आहे.