लग्नाच्या वरातीत "त्या" दोघांचा भलताच कार्यक्रम सुरू होता! डोणगाव पोलिसांनी असा वाजवला बँड... मग कळलं, ते तर....

 
 
मेहकर(प्रसाद देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्नाच्या वरातीत चुकीचे काम करणाऱ्या दोघांना डोणगाव पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.. विवेक उर्फ भैय्या मुरलीधर आखाडे (३५, रा. डोणगाव तालुका मेहकर) आणि ज्ञानेश्वर रामदास नवघरे (रा. पांगरी नवघरे, ह मु डोणगाव) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत..दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. दोन्ही आरोपी तडीपार होते..
   ३ मार्चच्या सायंकाळी डोणगाव येथे नवरदेवाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत अनिल केशव बाजड (२५,रा. नेतसा, ता. बीड) हे बँड वाजवण्याचे काम करत होते. या मिरवणुकीत विवेक आखाडे आणि ज्ञानेश्वर नवघरे घुसले. त्यांनी अनिल बाजड यांच्या खिशात हात घालून १२०० रुपये आणि रेड मी कंपनीचा १० हजार रुपयांचा मोबाईल बळजबळीने काढून घेतला. या प्रकारानंतर अनिल बाजरी यांनी डोणगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत लगेच घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध घेतला. अवघ्या दोन तासात दोन्ही भामटे पोलिसांच्या गळाला लागले. त्यांच्याकडून त्यांनी चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर याआधी दरोड्याचा गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मेहकर चे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. डी.नागरे , पोलीस उपनिरीक्षक मंगेश खडसे, पोलीस शिपाई आनंद चोपडे, हर्ष कुमार सेहगल, निखलेश चव्हाण यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सावले करीत आहेत..