मोटरसायकलवर गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना LCB ने पकडले; 1 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..!

 

जानेफळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत अवैधर रित्या गांजा बाळगणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. गजानन सुभाष मोहिते, गणेश संतोष वावगे दोन्ही राहणार आंबेटाकडी जिल्हा बुलढाणा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 1 लाख 61 हजार 120 रूपांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी गजानन सुभाष मोहिते, गणेश संतोष वावगे हे आपल्या मोटर सायकलवर अवैधरित्या गांजा घेऊन जात होते . याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींची गाडी अडवून पाहणी केली असता गाडीमध्ये 5 किलो 848 ग्रॅम किंमत 1 लाख 14 हजार 120 रुपये किमतीचा गांजा मिळून आला. तसेच आरोपींची मोटरसायकल किंमत 35 हजार रुपये असा एकूण 1 लाख 61 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या एपीआय यशोदा कणसे पोहेकॉ. अनुप मेहेर, पोहेकॉ दिनेश बकाले, पोहेकॉ. विजय पैठणे, पोहेकॉ. वनिता शिंगणे, पोकॉ. विजय वारुळे, पोकॉ. मंगेश सनगाळे, पोकॉ. निवृत्त पुंड, पोकॉ. कैलास ठोंबरे यांनी केली आहे.