ट्रकने बलेनो कारला कट मारला.. मग काय डायरेक्ट दंगा काबू पथकाला पाचारण आले! दोन गटात राडा राडा; देऊळगाव साकर्शा त नेमकं काय झालं? ४० जणांवर गुन्हे

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ट्रकने बलेनो कारला कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दरम्यान घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील मिळून एकूण ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील १४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

  बाळापूर येथील विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ने देऊळगाव साकर्शा येथील हर्षल प्रेमचंद नहार यांच्या बलेनोला कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला.हाणामारी झाल्याने यात ७ जण जखमी झाली आहेत. सदर घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने अतिरिक्त पोलीस कुमक व दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले. दोन्ही गटातील ४० जणांविरुद्ध कलम १०९,११५, (२), ३५२, ३५१, (२), (३),१८९, (२),१९१(२), (३),१९०, बि एन एस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यातील आरोपी हर्षल प्रेमचंद नहार, रितेश प्रेमचंद नहार, राहुल विजय गायकवाड, शिवा हरी नवत्रे, यश दिलीप बेगानी, आकाश गणेश नवत्रे, सुनील हरी नवत्रे, शेख युनूस शेख रऊल्ला, शेख सादिक शेख रऊल्ला, शेख राजीक शेख रऊल्ला, शेख अजहर शेख आयुब, शेख मंजूर शेख मुसा, शेख याकूब शेख मुसा, शेख अफजल शेख मदार अशा १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.