चिखलीत चोरट्यांचा हैदोस वाढला; मेहकर फाट्याजवळील शिवकृपा इंजिनियर वर्कशॉप मध्ये तीनदा चोरी; सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं दिसतं; पण पोलिसांना दिसत नाही....

 

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरात अलीकडच्या काळात चोरट्यांनी प्रचंड हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस चोऱ्या होत आहेत..मात्र पोलिसांना चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यश मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे..पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी, दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेऊन वेगवान तपास करावा, जेणेकरून चोरट्यांची हिंमत होणार नाही अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चिखली शहरातील मेहकर फाट्यानजीक असलेल्या शिवकृपा इंजिनियर वर्कशॉप मध्ये गेल्या महिनाभरात तीनदा चोरी झाली, याचे स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज आहेत...मात्र पोलिसांना चोरट्यांना हुडकून काढण्यात यश आले नाही..

चिखली ते मेहकर फाटा रोडवरील जिओ पेट्रोल पंपाच्या मागील भागात मलगी येथील संदीप शेळके , पवन शेळके या भावंडांचे शिवकृपा इंजिनिअर वर्कशॉप नावाचे प्रतिष्ठान आहे. १७ सप्टेंबरला तिथे जवळपास ७ ते ८ हजार रुपयांचे डिझेल चोरी झाले होते, त्याची रीतसर तक्रारही त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिली होती..मात्र पोलिसांनी वरचेवर तपास केल्याचे शेळके बंधूंचे म्हणणे आहे.
त्याआधी भंगार चोरी देखील झाली होती, काल ७ ऑक्टोबरला दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकीचे टायर देखील अनोळखी चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांची हिंमत सातत्याने वाढत आहे, पोलिसांनी यावर तातडीने कार्यवाही करावी.. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोर स्पष्ट दिसत आहेत मात्र पोलिसांना का दिसत नाहीत असा सवालही उपस्थित होतो आहे ..