चोरी करून चोरटे सुसाट सुटले, मध्येच गाडीचे टायर फुटले! सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी आवळल्या मुसक्या.... लोणारचा थरार
Updated: Jun 20, 2025, 20:26 IST
लोणार (प्रेम सिंगी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लोणार येथील विनायक चौकातील कुशल मेडिकलचे चोरट्याने शटर लॉक तोडून दुकानातील गल्ल्यात ठेवलेले 6 हजार 500 चोरून नेल्याची घटना काल 19 जूनच्या रात्री 10.30 सुमारास घडली होती. पोलिसांनी 24 तासाच्या आत घटनेचा तपास करून आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 7 लाख 6 हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कृष्णा सुदाम छेडीदार वय (34), साहेबराव उर्फ बाप्पा पाराजी चाळक (50), परमेश्वर अशोक गायकवाड (30) असे तब्येत घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शितलकुमार सुरजमल बोरा यांच्या लोणार शहरातील विनायक चौकात असलेल्या कुशल मेडिकल मध्ये काल 19 जूनच्या रात्री चोरट्यांनी मेडिकलचे शटर फोडून 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यासंदर्भातली तक्रार बोरा यांनी लोणार पोलिसात दिली होती. गस्तीवर असलेले अंमलदार ज्यांना मेडिकल समोर रंगाची ईरटीका गाडी संशयित रित्या घारगाव वेगाने सुलतानपूर कडे जात असताना दिसली त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग असताना त्या वाहनाचे टायर फुटले त्यामुळे वाहन हे रस्त्याच्या साईडचा दगडावर धडकले व वाहनातील आरोपींनी तेथून अंधाराचा फायदा घेत पड काढला. त्यातील एका पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून एक पथक नेमण्यात आले.
पोलिसांनी तब्येत घेतलेल्या आरोपीची विचारपूस करून इतर आरोपींना निष्पन्न करून त्यांना 24 तासाच्या आत तब्येत घेऊन त्यांच्या ताब्यातून चोरी करण्यासाठी वापरलेली ईरटीका गाडी, कटर, टाम्बा, कटावण्या, तलवार, चाकू, हातोडी असा एकूण ,7 लाख 6 हजार 470 रूपांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे, API गणेश इंगोले, PSI इंगळे, पोहेकॉ. संतोष चव्हाण, नितीन खराटे, गणेश लोढे, अनिल शिंदे, ज्ञानेश्वर निकस, गजानन डोईफोडे, हरिभाऊ ढाकणे यांनी केली आहे.