

चोरट्याने मारला चान्स! अमडापूरातील घटना
Apr 16, 2025, 09:56 IST
अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिनेसह रोख असा १ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना अमडापूर येथील भैय्या नगर मध्ये उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुजा अभय पारसकर ह्या अमडापूर येथील भैय्या नगर मध्ये भाड्याच्या घरात राहतात. त्या बाहेर गावी गेल्यामुळे अज्ञात चोरट्याने लक्ष ठेवून घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाटातील कानातले सोन्याचे ५ ग्रॅम व अडीच ग्रॅम, सोन्याचे एक ग्रॅम चा १ असे ६ सिक्के, सोन्याची पोथ व पदक अधिक नगदी जवळपास २१५०० रुपये असा १ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पूजा अभय पारसकर वय ४५ वर्ष रा. उदयनगर यांनी अमडापुर पोलीस स्टेशनला दिल्यावरून तक्रारीवरून अमडापुर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.