

मलकापूर ग्रामीणच्या ठाणेदारांनी ठणकावले..! रिकाम्या भानगडी केल्यास करणार करेक्ट कार्यक्रम; सोशल मीडियावर जबाबदारीने लिहा म्हणाले...
Mar 25, 2025, 15:49 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. चुकीच्या पोस्टमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्यास कठोर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे..
अलीकडच्या काळात व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम व रिल्समुळे दुसऱ्या धर्माच्या धार्मिक भावना दुखावून गावातील दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सामाजिक वातावरण दूषित होते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करावा असे आवाहन ठाणेदार संदीप काळे यांनी केले आहे. विशेष म्हणजे मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील ३४ गावांमध्ये दवंडी देऊन सोशल मीडियाचा वापर जपून करावा असे आवाहन करण्यात आले आहे..