मलकापुरात आगलाव्यांची दहशत..!१५ ते २० शेतातील शेतमालाला लावली आग; गुरांचा चाराही जळून खाक.... शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही झाला भुगा; आगलाव्याला काय मिळालं?

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातील बेलाड शिवारात आज सकाळी अग्नितांडव पाहायला मिळाले. अज्ञात विकृत आगलाव्याने १५ ते २० शेतातील शेतकऱ्यांचा शेतमाल पेटवून दिला. यात शेतकऱ्यांच्या शेतातील गुरांचा चारा , मक्याची गंजी जळून खाक झाली..शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा भुगा करून विकृत आगलाव्याला काय मिळाले असेल? असाच संतापजनक सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे..

घीर्णी रोडवरील बेलाड शिवारात हा प्रकार समोर आला. बिलाड शिवारातील शेतकऱ्यांनी शेतमाल तसेच तूर व मक्याचे कुटार साठवून ठेवले होते. या लागोपाठ असणाऱ्या १५ ते २० शेतांमधील शेतमाल अज्ञात भामट्याने पेटवून दिला. सकाळी कामानिमित्त शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली, त्यावेळी एकच धांदल उडाली. आग लावणारा विकृत भामटा कोण? याबाबतचा तपास मलकापूर पोलीस करीत आहेत. आता हाती आलेल्या माहितीनुसार एका संशयिताला मलकापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे...