

भरधाव थारने ॲपेला उडवले; ॲपे चालकाचा जागीच मृत्यू; आमखेड फाट्याजवळ झाला अपघात...
Nov 27, 2024, 09:44 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव वेगातील थार कारने मेहकरकडून चिखलीकडे येणाऱ्या ॲपेला जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपेचालक जागीच ठार झाला. आमखेड फाट्याजवळ शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता हा अपघात घडला.
बुलढाणा येथील टीबी हॉस्पिटलजवळील चैतन्यनगरमध्ये राहणारे कैलास रामदास काळे (४५) हे मेहकरहून प्रवासी सोडून ॲपे (क्रमांक एमएच- २८-टी-५०३) ने चिखलीकडे येत होते. आमखेड फाट्याजवळ सुसाट वेगातील महिंद्रा थार कार (क्रमांक एमएच-एसी-३९३९) च्या चालकाने ॲपेला जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपेचा अक्षरशः चुराडा होऊन चालक कैलास काळे यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत कैलास यांचा भाचा पंकज धनवे (चिखली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक राजेश झामाजी लोखंडे (तुकडे लेआउट नागपूर) याच्याविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.