नात्याला काळीमा फासला! ३० वर्षांने लहान असलेल्या भाचीवर बलात्कार!उपभोगासाठी मामाने मर्यादा ओलांडली! मोताळा तालुक्यातील घटना

 
 मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मामा भाची हे नातं तसं पवित्र अन् हळव...भाचीला अंगाखांद्यावर खेळणारा मामा..तिचे लाड पुरवणारा मामा... पण या पवित्र नात्याला एका नराधम मामाने काळीमा फासला आहे.. मोताळा तालुक्यातील एका मामाने चक्क आपल्या भाचीलाच उपभोगाची वस्तू बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे..हा नराधम मामा ४९ वर्षांचा असून भाची त्याच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान आहे..

  पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार घटना मोताळा तालुक्यातील आहे. मामा आणि भाचीचे गाव वेगवेगळे आहे. १९ वर्षीय पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते, घरकाम करते व शेतीकामातही मदत करते. यंदा जानेवारी महिन्यातील पंधरा तारखेला दुपारी दोन वाजेच्या सुमारास नराधम मामाने भाचीलाच वासनेची शिकार बनवले.
  या प्रकरणानंतर आरोपी मामाची हिम्मत वाढली..त्यानंतर पुन्हा दोनदा हा प्रकार घडला. दोन वेळा नराधम मामाने भाचीवर बलात्कार केला. याबद्दल कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील मामाने दिली..
मामाचा त्रास वाढतच चालला होता.. वारंवार हा प्रकार वाढत असल्याने पीडित भाचीने बोराखेडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.तक्रारीवरून पोलिसानी मर्यादा ओलांडणाऱ्या मामाला अटक केली आहे..