पोलीस दारू पकडायला गेले अन् सापडला गांजा! LCB ची बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई....

 
 मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारातील गट क्र. ३२ मध्ये २ लाख ५९ हजार रुपयांचा १३ किलो ९५० ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हे शाखेसह बोराखेडी पोलिसांनी जप्त केला आहे. २९ नोव्हेंबर रोजी सदर कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे....
बोरखेडी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मोहेगाव शिवारात २९ नोव्हेंबर रोजी गट क्र. ३२ जवळील नाल्यात अवैधरित्या गावठी दारू अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर बोरखेडी पोलिसांनी 
दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेले. त्यावेळी गजानन मांगो जाधव हा पोलीसांना पाहून पळून जाताना दिसून आला. पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी फरार झाला. त्याच्या शेतात जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी धुऱ्यावर दोन पोतड्यांमध्ये २ लाख ५९ हजार रुपयांचा १२ किलो ९५० ग्रॅम गांजा मिळून आला. या प्रकरणी बोरखेडी पोलिसांनी गजानन जाधव याच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), ११ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय बालाजी शिंगेपल्लू करीत आहेत
यांनी केली कार्यवाही
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आशिष चचडे, यशोदा फणसे, पीएसआय सचिन कानडे, पोहेकॉ टेकाळे, लेकुरवाळे, एनपीसी पाटील, वारुळे, पैठणे, शिंगणे, वायाळ, हेलगे, बकाले तसेच बोराखेडीचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, पीएसआय राजेंद्र कपले, एनपीसी अमोल खराडे, प्रवीण पडोळ, पोहेकॉ नंदकिशोर धांडे, गणेश बरडे, प्रमोद साळोक यांच्या पथकाने केली.