पोलिस मागे अन् ते पुढे.. पाऊण तास सुरू होता सिनेस्टाईल पाठलाग! अखेर डोणगावच्या समृद्धी पुलाखाली लागले हाती; पकडला मोठा माल;–LCB व डोणगाव पोलिसांची मोठी कारवाई

 

  आज २७ मार्चच्या पहाटे अमडापूर येथून डोणगाव येथे सय्यद आरिफ सय्यद हशम (रा. अमडापूर) व मजहर खान अफसर खान (साखरखेर्डा) हे एका बोलेरो पिकप वाहनाने प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती एलसीबी ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या वाहनाला अमडापूर येथील कमळजा मातेच्या मंदिराजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पिकप वाहनाने तेथून पोलिसांना चुकारा देण्याचा प्रयत्न केला. एलसीबी पथकाने या वाहनाचा पाठलाग सुरू केला, दुसरीकडे डोणगाव पोलिसांना वाहन डोणगावकडे येत असल्याचे सांगत अलर्ट केले. डोणगाव पोलीस समृद्धी महामार्गाच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अवैध गुटखा वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. त्यातून विमल कंपनीचा सुगंधित गुटखा, तंबाखू असा ९ लाख ६ हजार ९६ रुपयांचा प्रतिबंधित माल व पिकअप वाहन असा २१ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कानडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चांद, युवराज राठोड व डोणगाव पोलीस स्टेशनचे पवन गाभणे हर्ष सहगल यांनी केली...