

म्हातारी आजी लेकरांना अंगणात खेळवत होती; चोरट्यांनी संधी साधली! शेगाव ची घटना
Nov 30, 2024, 09:55 IST
शेगांव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) :- शेगांव शहरातील माऊली नगर मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून अल्मारीत ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी १ लाख ८० हजार रुपयाचा मददेमाल लंपास केला.
पंकज मुकुंदराव काळे वय ३० रा.माउली नगर शेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की माझी आजन सासु ही वयस्कर असुन ती मुलांना अंगणात खेळवित असतांना तिच्यावर लक्ष ठेवुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या घरात प्रवेश करुन माझे घरातील अलमारीत ठेवलेले एक सोन्याचे कडे २० ग्रॅम कि.अं १, लाख १० हजार, सोन्याचे मंगळसुत्र वजन १२ ग्रॅम कि.अं ३० हजार, सन २०२१ मध्ये घेतलेली, दोन सोन्याच्या अंगठ्या वजन ८ ग्रॅम कि. अं ३० द.तार सन २२१ मध्ये घेतलेल्या, नगदी १० हजार रुपये एकुण १ लाख ८० हजार रुपयाचा मददेमाल लंपास केला आहे. या प्रकरणी शेगांव पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३३१(३), ३०५ भारतीय न्याय सहीते नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे