व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्या चार दिवसात बेपत्ता होणाऱ्यांची संख्या वाढली! जिल्ह्यातून १२ मुली गायब...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रेमाचा आठवडा म्हणून तरुणाई मध्ये सध्या ट्रेंडिंगला असलेला व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी असा हा व्हॅलेंटाईन वीक तरुणाईकडून साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडपे या आठवड्याचे वेगवेगळे प्लॅन रचतात.. रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे,टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे, व्हॅलेंटाईन डे असे वेगवेगळे दिवस साजरा केले जातात..दरम्यान आता या व्हॅलेंटाईन वीक मध्ये  जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे.. बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून बेपत्ता होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे..७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या ४ दिवसात जिल्ह्यातून १२ मुली बेपत्ता झाल्या आहेत..

बुलढाणा जिल्ह्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विशेषता लगीन सराई सुरू झाल्यानंतर बेपत्ता होणाऱ्या मुलींचे प्रमाण आणखी गतीने वाढते. घरच्यांचा लग्नाला असलेला विरोध या प्रमुख  कारणासह कौटुंबिक कलह हे देखील एक मोठे कारण यामध्ये आहे. बेपत्ता होणाऱ्यांचे वय १८ वर्षापेक्षा अधिक असेल तर पोलिस मिसिंग नोंद करतात. मात्र अशा प्रकरणात तपास फार वेगाने होत नाही, कारण मुली किंवा महिलांच्या बेपत्ता होण्याचे मूळ कारण पोलिसांना असते. मात्र एखादे प्रकरण संशयास्पद वाटल्यास पोलिस वेगाने तपास करतात. १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी बेपत्ता होते तेव्हा मात्र पोलिसांना अपहरणाचा गुन्हा दाखल करावा लागतो, आणि तातडीने मुलीचा शोध घ्यावा लागतो. अशा प्रकरणात मुलगी ज्याच्या सोबत गेली त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत १२ जणी बेपत्ता झाल्या आहेत. त्यात काही विवाहितांचा देखील समावेश आहे.

ह्या झाल्या गायब...

कु. शितल गजानन मानेकर ही २१ वर्षीय तरुणी घाटपुरी खामगाव येथून बेपत्ता झाली.निकिता गजानन हिस्सल (२४, पिंपळगाव काळे जळगाव जामोद), स्नेहल हरिदास पाटील (२३, बुलडाणा), जया लक्ष्मण वाघ (२८, धाड), मंजुषा योगेश जोपे (३५, तळणी), प्रेरणा सुभाष वाकोडे (२०, आम्रपाली नगर ,शेगाव), शालिनी गोपाल वावगे (२२, संग्रामपूर), वैष्णवी रामदास घोलप (२०, चौबारा चौक, जळगाव जामोद) या तरुणी जिल्ह्यातून बेपत्ता झाले आहेत. याशिवाय चार तरुण देखील बेपत्ता झाले आहेत.