तळपायाची आग मस्तकात नेणारी बातमी! १२ वर्षीय चिमुकलीला नराधमाने केले प्रेग्नेंट; चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना
Feb 14, 2026, 13:56 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला चिखली तालुक्यात संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षाच्या नराधमाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेग्नेंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वासनांध नराधम आरोपी हा डोंगरखंडाळा येथील राहणारा आहे. सागर शेषराव सुरडकर असे नराधम आरोपीचे नाव आहे.
१३ फेब्रुवारी च्या सायंकाळी मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणाची तक्रार दिली. पीडित १२ वर्षीय मुलगी चिखली तालुक्यातील एका गावची राहणारी आहे. ८ जून २०२५ वासून आरोपी सागऱ्याची वासनांध नजर मुलीवर पडली.
घरी एकटी असल्याची संधी साधून शारीरिक भूक भागवण्यासाठी नराधमाने मुलीवर अत्याचार केला. वेळीवळी हा प्रकार सुरू होता. ८ फेब्रुवारीपर्यंत वेळोवेळी हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एके दिवशी अचानक मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर तपासणी अंती मुलगी प्रेग्नेंट असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.