दगडाच्या काळजाची माय! २ महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर टाकून पळून गेली; देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागीले येथील घटना...
Updated: Oct 4, 2024, 17:43 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आई खरचं काय असते,लेकराची माय असते ,वासराची गाय असते..अशी माय नात्याची महती अनेक कवींनी शब्दातून मांडली आहे..अर्थात ते १००१ टक्के खरेच आहे..मात्र देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागीले येथे दगडाच्या काळजाच्या मातेने धक्कादायक प्रकार केलाय..आपल्या २ महिन्यांच्या गोंडस मुलीला उघड्यावर टाकून ही निर्दयी माता पसार झाली.
टाकरखेड भागीले येथील बबन नामदेव खरात यांच्या घरासमोर कुणीतरी २ महिन्याची चिमुकली रात्रीला आणून टाकली. सकाळी अंगणात चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आल्याने गावातील बरेच जण तिथे जमा झाली. मुलगी कुणाची अशी विचारणा करण्यात आली मात्र ते बाळ कुणाचे हे समोर आले नाही.👇
अखेरीस पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. चिमुकलीला आधी देऊळगाव राजा येथे व नंतर जालना येथील स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. चिमुकलीची प्रकृती चांगली असून ती दिसायला देखील अतिशय गोंडस आहे. मात्र निर्दयी माता पित्याने तिला असे का उघड्यावर टाकले?.याबद्दल पोलीस तपास करीत आहेत.