प्रेमविवाह फसला...! आधी लव्ह मॅरेज केले आता म्हणतो, तू माही जिंदगी बरबाद केली..दुसऱ्या मुलीसोबत सुरू केले लफडे..; खामगावच्या नेहाची दर्दभरी स्टोरी नेमकी काय? वाचा...

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावात एका २३ वर्षीय विवाहितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नवऱ्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिची आपबिती ऐकून तिच्या नवऱ्यासह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नेहा प्रज्वल हिवराळे असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे नेहाचे प्रज्वल सोबत लव्ह मॅरेज होते..
  गारडगावच्या बौद्ध विहारात ११ फेब्रुवारी २०२४ ला नेहाचे प्रज्वल हिवराळे याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र एकाच वर्षांत दोघांच्या संसारात कुरबुरी झाल्या आहेत. नेहाने दिलेल्या तक्रारीनुसार दोघांच्या लग्नाला प्रज्वल च्या आई वडिलांचा आणि आत्याचा विरोध होता. त्यामुळे सासू-सासरे निहाला नेहमी टोमणे मारत होते. तू लग्नात कोणताही हुंडा दिला नाही तू फुकाची बायको आहेस आम्हाला लाखाची बायको पाहिजे होती असे म्हणत सासू सासरे नेहाला हिणवायचे. नेहाचे सासू-सासरे नेहाच्या नवऱ्याला एकाचे दोन सांगून भांडणे लावून देत होते. " मी तुला सांगली पैशापाली बायको करून देते, तू हिला फारकती दे" असे नेहाची आत्येसासू प्रज्वलला सांगायची असे तक्रारीत म्हटले आहे.
४ महिन्यांत म्हणे फारकती दे..
दरम्यान लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात प्रज्वल आणि त्याचे कुटुंबीय नेहाला "कागदावर फारकती दे, आम्हाला मोकळे कर.. तू आम्ही म्हणू तिथे सह्या कर नाहीतर तुझ्या आई-वडिलांना जिवाने मारून टाकू " असे म्हणत धमकी दिल्याची तक्रारीत म्हटले आहे. १० जून २०२४ ला नेहाला प्रज्वलने मारहाण केली आणि तिची इच्छा नसताना फारकतीच्या गैरकायदेशीर सह्या देखील घेतल्या. नेहाने सह्या करण्यास नकार दिला असता चाकूचा धाक दाखवून सह्या घेतल्याचे नेहाने तक्रारीत म्हटले आहे. नेहा माहेरी गेली असता प्रज्वल तिला फोन करायचा.. "तुझ्यामुळे माझ्या आयुष्य बरबाद झाले, तुला सोडणार नाही, जीवे मारून टाकील..आता माझे दुसऱ्या मुली सोबत लफडे चालू आहे, तुला काय करायचे करून घे" अशा धमक्या देखील प्रज्वलने दिल्याचे नेहाने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून नेहाचा पती प्रज्वल , सासरा अनिल हिवराळे, सासू करुणा हिवराळे आणि आत्येसासू सविता तायडे (सर्व रा. रावण टेकडी खामगाव) अशा चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.