खडकपूर्णाच्या कॅनॉलमध्ये चिमुकला वाहून गेला! अंचरवाडीची घटना! वस्तीगृहात राहून शिकत होता... आई-वडिलांचे क्षेत्र आधीच हरवले होते
Feb 15, 2026, 14:43 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्याने वस्तीगृहात राहून शिक्षण घेणारा एक चिमुकला खडकपूर्णाच्या कॅनॉल मध्ये वाहून गेला. पोहण्यासाठी तो कॅनॉल वर गेला होता, त्यावेळी धुण्यासाठी गेलेल्या काही महिलांनी त्याला पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार स्वराज गणेश खरात असे चिमुकल्याचे नाव असून तो अकरा वर्षाचा आहे. अंचरवाडी येथील श्री शिवाजी विद्यालयात तो ५ व्या वर्गात शिकत होता व तिथल्या वस्तीगृहात राहत होता. आज सकाळी तो पोहण्यासाठी खडकपूर्णा कॅनॉल मध्ये गेला, तिथे तो वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले असून शोध सुरू आहे.