चोरट्यांची लाईन गेली! सौर ऊर्जेच्या पावणे दहा लाखांच्या प्लेटा चोरल्या!

 
 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :मोताळा शिवारातील ज्ञानेश्वर शिवाजी देशमुख यांच्या शेतातील सौर ऊर्जाच्या ११५ प्लेटा किंमत ९ लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या ५ आरोपींनी संगणमत करुन चोरुन नेल्या प्रकरणी पाच जणा विरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 सुनिल तेजराव उबरहंडे, रा. छत्रपती नगर, बुलढाणा यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की. मोताळा शेतशिवारातील ज्ञानेश्वर शिवाजी देशमुख यांच्या शेतात खाजगी सुरक्षागार्ड विठ्ठल शिवाजी शेळके, रा.तिघ्रा ता. मोताळा, खाजगी सुपरवायझर गोपाल आजाबराव देशमुख रा. मोताळा यांनी ड्युटी लागली असता त्यांनी आरोपी अनुप कैलास खर्चे, रा. मोताळा, नीलेश शिवाजी देशमुख रा. मोताळा तसेच एक विधिसंघर्ष बालक यांचे सोबत संगनमत करून कंपनीचे मालकिच्या ११५ सोलर प्लेटा किंमत ९ लाख ७७ हजार ५०० रूपयेचा माल चोरून नेला आहे. त्यापैकी आरोपी अनुप खर्चे याच्या शेतात पाहणी केली असता तिथे ११ प्लेटा किंमत ९३ हजार ५०० रूपयचा माल लपवलेला दिसून आला. अशा फिर्यादीवरून बोरखेडी पोलिसात पाच आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.