घरमालकाने मध्यरात्री दरवाजा उघडला अन् दिसलं भलतचं; दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; मोठ्या मेऱ्याच्या घटनेची जोरदार चर्चा..

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मेरा बु येथे घडलेल्या एका घटनेची जोरदार चर्चा. एक चोरटा मध्यरात्री एका घराच्या मागच्या दरवाजाने घरात शिरला.मागून तो दुसऱ्या मजल्यावर चढला, त्यानंतर घरात चोरी करण्याच्या उद्देशानेच शोधाशोध करू लागला..तेवढ्यात घरमालकाला जाग आली, त्यांनी दरवाजा उघडल्यावर चोरटा त्यांच्या खोलीत उभा दिसला.. घर मालकाला पाहून चोरटा घाबरला..त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली..मात्र त्याला घरमालकाने व इतरांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश राजू भुसारी ( रा. मेरा बु) असे चोरट्याचे नाव आहे. गणेश हा अनंता जगन्नाथ अवचार यांच्या घरात शिरला होता. अनंता अवचार यांच्या तक्रारीवरून गणेश विरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.