भर दिवसा घर फोडले! पोलिसांचा धाक उरला की नाही? मोताळा तालुक्यातील पिंपळपाटी येथील घटना! बोराखेडी पोलिसांना चोरट्यांचे पुन्हा चॅलेंज....
Updated: Jan 24, 2025, 11:19 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत शहरासह परिसरात मागील वर्षापासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक घरांना चोरट्यांनी लक्ष केले असून लाखो रुपयांचा माल चोरट्याने लंपास केला आहे. यातच काल 23 जानेवारीच्या दुपारी पिंपळपाटी येथे काही अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा कपाट फोडून दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने चोरट्यांना पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न सर्वसामान्या मध्ये निर्माण झाला आहे.
मागील वर्षभरामध्ये बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरासह आता चोरट्यांनी ग्रामीण भागात देखील आपला मोर्चा वढवला आहे. त्यातच काल भर दिवसा पिंपळपाटी येथील संजय नारायण घाटे यांच्या घरातील चोरट्यांनी कपाट फोडून दीड लाखांचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभरामध्ये झालेल्या चोरीच्या घटना मधील काही घटनेतील आरोपीना अद्यापही पोलिसांना पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनामुळे चोरट्यांना पोलिसांची भीती राहिला नाही का असा प्रश्न आता सर्व सामान्यांना पडला आहे.