कारवाईचे आश्वासन दिल्यावर १५ तासानंतर सुरू झाली थांबवलेली गणेश विसर्जन मिरवणूक! दगडफेकीचा प्लॅन आधीच केला होता का? गच्चीवर दगड आधीच कसे पोहचले...! जळगाव जामोद मध्ये नेमकं काय झालं...

 

जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद येथे काल गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर रात्री ९ वाजेपासून जवळपास १५ तास गणेश विसर्जन मिरवणूक थांबली होती, जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मिरवणूक पुन्हा सुरू करणार नसल्याची भूमिका गणेश मंडळांनी घेतली होती.

आता अखेर दुपारी १ वाजता पुन्हा गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे..कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ही मिरवणूक सुरू झाली.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.....

जळगाव जामोद शहरातील वायलीवेस भागात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती.विशेष म्हणजे घराच्या छतांवरून दगडफेक झाल्याने व नेमकी त्याचवेळी लाईट बंद झाल्याने हा दंगल घडवण्याचा प्रि प्लॅन होता असा आरोप गणेश भक्तांकडून करण्यात येत आहे.👇

 

दगडफेकीच्या घटनेनंतर शहरातील दुर्गा चौक व पोलीस स्टेशन जवळ जमलेल्या गणेश भक्तांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठी- चार्ज करण्यात आला. त्यामुळे लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी व दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी रात्रीपासून गणेश भक्त करत होते.👇

 

स्वतः आमदार संजय कुटे यांनी या घटनेची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. दगडफेकीचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी १ वाजता पुन्हा मिरवणूक सुरू झाली.👇

 

कुलूप बंद..

 दरम्यान वायली वेस भागातील ज्या घरांच्या छतांवरून गणपती मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली त्या घरांना सध्या कुलूप लागलेले आहेत. दगडफेक करणारे आरोपी रात्रीपासूनच फरार आहेत, काही व्हिडिओ फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याआधारे पोलीस आरोपी दंगलखोरांच्या मुसक्या आवळणार आहेत. ही दगडफेक पूर्वनियोजित असल्याच्या संशय व्यक्त होत आहे. कारण घरांच्या छतांवर दगड आणि विटा आधीच नेऊन ठेवण्यात आल्या होत्या..🤚