मोताळ्यात आगीचे रौद्ररूप! आठवडी बाजारातील दुकानांना आग! ५५ ते ६० लाखांचे नुकसान....!

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील आठवडी बाजारात असलेल्या खरबडी रोडवरील वेगवेगळ्या चार दुकानांना शॉटसर्कीटमुळे आग लागून या सर्व दुकानचे ५५ ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चारही दुकाने जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही प्राणहाणी झालेली नाही. 

 खरबडी मार्गावरील शुभम विजय खर्चे यांच्या जयदुर्गा इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्स, नरेश इंगळे यांचे श्री किराणा, ज्ञानदेव सोनोने यांचे सलून आणि सोपान सोनोने यांचे टेलरिंग दुकान या चार दुकानामध्ये आग लागली होती. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवत शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन टँकरद्वारे पाणी आणून आग आटोक्यात प्रयत्न झाला; मात्र ती आटोक्यात आली नाही, यानंतर बुलढाणा व मलकापूर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. जवळपास दोन तासांच्या अथक
प्रयत्नांनंतर, मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे इतर दुकाने वाचविण्यात मिळाले. दरम्यान, नुकसान झालेल्या व्यावसायिकांना भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.