आग्यामोहळ उठलं; कुटुंबावर मधमाशांचा हल्ला;नऊ जण जखमी! खामगाव तालुक्यातील घटना..

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मधमाश्यांच्या हल्ल्यात नऊ जण जखमी झाल्याची घटना आज खामगाव तालुक्यातील राहुड, हिवरा मांडका शिवारात घडली आहे.
खामगावा'च्या टाकळी तलाव येथील मेढे कुटुंब आपल्या परिवारासह शेतात राहतात. आज ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान शेतात काम करीत असताना अचानक मधमाशांनी या मेढे कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात सुभद्राबाई गजानन मेढे (५५), गजानन उत्तम मेढे (३५), आरती गजानन मेढे (३२), अर्पिता गजानन मेंढे (१२), कार्तिक गजानन मेढे (५), नीलम महादेव इंगळे (१६) हे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी त्वरित खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
दुसऱ्या घटनेत खामगाव तालुक्यातील हिवरा मांडका शिवारात आज ४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान वैभव तुकाराम अतकरे (२७), गोपाल राजाराम अतकरे (३१), गोपाल वासुदेव बाजाडे (२७), हे तिघे शेतातील झाडाखाली बसलेले असताना त्याच्यावर सुद्धा मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. हल्ल्यात हे तिघेही जखमी झाले आहेत. तिघांनाही खामगाव'च्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.