

शेतीच्या धुऱ्याचा वाद पेटला! कोथळीत दोन गटात ठोका– ठोकी! दोन्ही गट पोलिस ठाण्यात...
Apr 2, 2025, 12:01 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मोताळा तालुक्यातील कोथळी येथे शेतीच्या धुऱ्याच्या वाद होवून या वादातून चापटा बुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी दोन गटांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी १० जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
किशोर तुळशीराम पाटील कोथळी यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली की, गोपाल सुधाकर सातव, मनीष सुधाकर सातव, विवेक दामोधर सातव, दामोदर समाधान सातव, सुधाकर समाधान सातव कोथळी तर तरोडा येथील नारायण खडे यांनी शेतीच्या धुऱ्याच्या कारणावरुन गैरकायदयाची मंडळी जमवून शेतामध्ये ट्रॅक्टर घालून बांध टाकून नांगरणी केली. त्यास फिर्यादी समजविण्यास गेले असता त्यांनी हातात कु-हाडी, विळे घेवून येत शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त सहा जणांवर भारतीय न्याय संहिताचे कलम १८९ (२), १९८ (३), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. तर मनिष सुधाकर सातव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, किशोर तुळशीराम पाटील, राधा किशोर पाटील, मुलगा ऋषिकेश किशोर पाटील, शंतनु किशोद पाटील कोथळी हे फिर्यादी मनिष सातव यांच्या घरासमोर येवून किशोर पाटील याने तू माझे शेत का नागरले, असे म्हणून शिविगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीची पत्नी रेणू सातव भांडण सोडविण्यासाठी आली असता, तिला राधा पाटील, शंतनु पाटील, ऋषीकेश पाटील यांनी अश्लिल शिविगाळ करीत अंगावर धावून आले.
तर किशोर पाटील याने फिर्यादीस बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीवरुन बोराखेड पोलिसांनी उपरोक्त चौघांवर भारतीय न्याय संहिताचे कलम २९६, ११५, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकांत चिटवार हे करीत आहेत.